आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:बधाई हो, बेटी हुई है उपक्रमांतर्गत मुलींसह मातांचा केला सन्मान

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ औद्योगिक क्रांती न करता सामाजिक कार्यात देखील आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या राजुरी स्टीलच्यावतीने स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात जनजागरण करून सर्वत्र ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा जागर केला. वितरकांच्या माध्यमातून सबंध राज्य आणि देशभरात ‘बधाई हो, बेटी हुई ह’ उपक्रमाअंतर्गत राजुरी स्टीलच्यावतीने स्त्रीजन्माचे स्वागत करून मुलींसह त्यांच्या मातांचा सन्मान करण्याची अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राजुरी स्टीलच्यावतीने गेल्या एक दशकापासून ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश गावोगावी पोहचविण्याचे काम केले जात आहे. स्टील उत्पादनात क्रांती करणाऱ्या राजुरी स्टीलच्या टीमने सामाजिक जाणिवेतून सामाजिक उपक्रम राबविण्यावर नेहमी भर दिला आहे. याच उपक्रमांतर्गत स्त्र्रीभ्रूण हत्येचा विरोध आणि स्त्रीजन्माचे स्वागत करण्याची अनोखी परंपरा सुरू करण्यात आली आहे. गर्भातच कळी खुडणाऱ्यांना कळीचे महत्व पटवून सांगण्याचा विडाच राजुरी स्टीलने उचलला आहे.

त्यामुळेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोस्टर प्रदर्शन, पथनाट्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध आणि स्त्रीजन्माचे स्वागत याविषयी जनजागरण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत तिच्या कुटूंबियांसोबत करण्याचा हा उपक्रम नुकताच राजुरी स्टीलच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यात घेतला जात आहे. याची व्याप्ती इतर ठिकाणीही वाढत चालली आहे. लवकर संपूर्ण महाराष्ट्रात ही जनजागरण मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अभियानाची व्याप्ती महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपणही स्त्री जन्माचे आपण स्वागत केले पाहिजे, आज स्त्रिया माणसाच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळया क्षेत्रात कार्य करून नावलौकीक करीत आहे. गेल्या काही दशकात महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर खूप कमी झाल्याचे समजताच एक जबाबदार उद्योजक या नात्याने स्टील विक्रीच्या माध्यमातून केवळ व्यापार न करता सामाजिक कार्यासाठी देखील कंपनीचे एक पाऊल पुढे आहे.

राजुरी स्टीलच्या चोहीकडे पसरलेल्या वितरकांच्या टीमच्या माध्यमातून पोस्टर प्रदर्शन असो किंवा पथनाट्याच्या माध्यमातून वितरकांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘बधाई हो, बेटी हुई है’ या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसात मिळत आहे. आता हे अभियान औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून लवकरच या अभियानाची व्याप्ती महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राजूरी स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक कैलास लोया यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...