आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर व मंठा तालुक्यात तब्बल ५५ ग्रामपंचायती मध्ये कॉग्रेस व महाआघडीच्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांना निवडणुन आणत कॉग्रेसचा दबदबा कायम राखला असल्याच्या भावना माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केल्या. एकुन ८४ पैकी २४ ठिकाणी स्पष्ट काँग्रेसची सत्ता आली असून ३१ ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत युती करत महाविकासआघाडी ने यश मिळवल्याचे म्हटले आहे.
जेथलिया यांनी म्हटले की, सध्याचा काळ हा अतिशय अति तटीचा असतांना विशेष म्हणजे सत्ताधा-याकंडून ग्रामपचायती ताब्यात दया आम्ही तुम्हाला करोडो रूपयाचा निधी देउ अशा अनेक थापा देउन ही या सामन्यात कॉगेसच्या पदरी मतदारांनी मोठे यश दिले. मतदारसंघातील महत्वाच्या नेर, तळणी हया मोठया ग्रामपंचायतीत कॉग्रेसची सत्ता आली.
परतुर मतदारसंघात ढोकमाळ तांडा, चिंचोंली, चांगतपुरी, बाबुलतारा, दहिफळ भेगांने, खडकी-कंडारी, दैठणा खुर्द, पिंपृळा,कोरेगाव, तळणी, रामतिर्थ, सावरगाव भागडे, खांबेवाडी, मोहाडी, कठाळा खू, पाकणी, ढगी यासह अनेक ग्राम पंचायतीत कॉग्रेस महाआघाडी ने सत्ता मिळवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.