आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपोषण रद्द:उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काढली काँग्रेसचे नाराज आमदार कैलास गोरंट्याल यांची समजूत, आमदारांनी उपोषण केलं रद्द

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधी वाटपामध्ये काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याचे म्हणत काँग्रेसचे 11 आमदार उपोषण करणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांच्याकडून देण्यात आला होता. या सर्वानंतर अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांना फोन करत त्यांची समजूत काढली आहे. यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे.

अजित पवार यांनी फोन करत कौलीाश गोरंट्याल यांची समजूत काढली. अजित पवार म्हणाले की, काँग्रेससोबत आम्ही कोणताही दुजाभाव करत नाही. मात्र यापुढे निधी वाटपाविषयी तुमच्याविषयी प्राधान्याने विचार केला जाईल. अजित पवारांनी दिलेल्या या आश्वासनानंतर गोरंट्याल यांनी उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा नेहमीच सुरू असतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला दुजाभाव केला जातो असाही आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. आता काँग्रेस आमदारांनी पुन्हा हेच कारण देत उपोषणाचे अस्त्र उगारले होते. असे असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.

गोरंट्याल का होते नाराज?
कैलास गोरंट्याल हे राज्य सरकारवर नाजार होते. त्यांनी सरकार काँग्रेससोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. आरोपत असा होता की, जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या ताब्यामध्ये तीन नगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये अंबड, परतूर आणि जालन्याचा समावेश होते. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यंत 29 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांच्याकडून करण्यात आला होता.