आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:काँग्रेसकडून निष्ठावंत कार्यकर्ते राजेश राठोड यांना विधान परिषदेची उमेदवारी

जालनाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांच्या सोबत राजेश राठोड - Divya Marathi
राहुल गांधी यांच्या सोबत राजेश राठोड
  • या जागेसाठी पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, बसवराज पाटील यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती

महेश देशपांडे

जालना जिल्ह्यातील मंठा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे सुपुत्र राजेश राठोड यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळाले असून राजेश राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जालन्याचे राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली. या जागेसाठी पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, बसवराज पाटील यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र जालना जिल्ह्यातील बंजारा समाजाचे राठोड यांना पक्षाने पसंती दिली आहे. काँग्रेसने धक्का तंत्र वापरून सोशल इंजिनिअरिंग करीत राठोड यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार धोंडीराम राठोड पुर्वी पासूनच गांधी घराणे व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. राजेश राठोड यांचे हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य असलेले राजेश जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहेत. राठोड कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. राजेश राठोड हे गेल्या विधानसभा निवडणुकीत परतूर मतदारसंघातून इच्छुक होते. पक्षाकडे त्यांनी उमेदवारी देखील मागितली होती, परंतु पक्षाने सुरेश जेथलिया यांना उमेदवारी दिली. काँग्रेस पक्षाने आता विधान परिषदेवर राजेश राठोड यांनी संधी देऊन योग्य न्याय दिल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

राजेश राठोड यांचे वडील धोंडीराम राठोड काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होते. तर राजेश राठोड यांच्या आई यादेखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होत्या. स्वतः राजेश राठोड जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत होते. युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम केले. मंठा तालुक्यात राठोड यांच्या शैक्षणिक संस्था देखील आहेत. राजेश राठोड यांना विधान परिषदेवर संधी देऊन काँग्रेसने बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे .

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्त्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यातील पाच जागा महाआघाडीच्या वाट्याला सहजपणे येत आहेत. त्यात काँग्रेसने दोन जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार, याची उत्सुकता आहे. भाजपने आपल्या चार जागांची उमेदवारी जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...