आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे बाहेरच्या देशातील षडयंत्रामुळे होत आहे'. असे बोलुन शेतकरी बांधवाच्या आंदोलनाची मानहानी केली आहे. अशी टीका करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दानवेंच्या भोकरदन येथील घराला घेराव घातला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि युवक काँग्रेसने आज रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन करून रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी असा आग्रह धरल्याने आणि घोषणाबाजी चालू झाल्यावर काँग्रेस पक्षाचे आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकरी बांधवाना कंगाल करून ठराविक धनदांडग्या लोकांचे हित पाहणारे तीन काळे कायदे केंद्र सरकारने आणले आहेत. या शेतकरी विरोधी कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत असताना रावसाहेब दानवे यांनी अकलेचे तारे तोडून शेतकरी विरोधी बेताल वक्तव्य केले आहे. अशी टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनात बीड जिल्हा युवक काँग्रेसचे श्रीनिवास बेदरे, काँगेस जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राहुल देशमुख, अभय देशमुख, अखिल पटेल, मनोज कायन्द्रे, मुज्जफार खान, प्रणित खाजें, अनुराग शिंदे, कपिल डोके, विवेक गाववनडे, राहुल संत, अग्रस्थानी होते. त्यांच्या या तत्परतेचे सर्व बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी कौतुक केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.