आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड:महाद्वारी बारवेच्या संवर्धनाला पालिकेच्या माध्यमातून सुरुवात

अंबड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महाद्वारी/मदारी बारवेच्या संवर्धनाला पालिका मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांनी सुरुवात केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने बारवेच्या आजूबाजूला असलेल्या सुबाभळी काढण्याचे काम सुरू आहे. बारव परिसरातील अडथळा दूर झाल्यानंतर बारवेतील गाळ काढून बारवेचे निखळलेले चिरे त्याच ठिकाणी बसवण्यात येणार आहे.

बारव संवर्धन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना निश्चित लाभ होईल.भारतीय स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना राज्य सरकार बारव संवर्धनासाठी उपाययोजना करीत असून यामध्ये जिल्ह्यातील ३८ बारवांचा समावेश केलेला आहे. अंबड तालुक्यातील आठ बारवांचे या माध्यमातून संवर्धन होणार आहे. या आठ बारवा पैकीच महाद्वारी/मदारी बारव आहे. महाद्वारी बारव संवर्धनासाठी शहरातील अनेक नागरिक श्रमदानासाठी तसेच लोकसहभाग देण्यासाठी तयार आहेत. पालिका प्रशासनाच्या आवाहनाला साद म्हणून महाराष्ट्र बारव मोहीम व वारसा संवर्धन समिती सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे बारव संवर्धन समितीचे रामभाऊ लांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...