आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षण सरकारने 7 आँगस्टपर्यंत जाहिर करावे म्हणून मौजे, भांबेरी (ता. अंबड, जि. जालना) येथे पुर्वतयारी रॅली काढण्यात आली. या पुर्वतयारी रॅलीसाठी भांबेरीत मराठ्यांचा जनसागर लोटला होता.
बेमुदत उपोषणाचा इशारा
सरकारने जर 7 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाबाबत आणि निवेदनावरिल सर्व मागण्या मंजूर केल्या नाहीत तर 8 ऑगस्टपासून भांबेरीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू होणार आहे, भांबेरीतील हजारो महिला, तरूण, तरूणी, पुरूष आपआपल्या बैलगाड्या, टँक्टर, मोटारसायकल, फोरव्हिलर घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते.
सरकारला अल्टीमेटम
मराठा आरक्षण लढ्याचे भगवे निशाण गावातील हजारो महिला, मुलीच्या हस्ते फडकवून, भांबेरी गावकर्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला की, हे निशान यासाठी फडकवले आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षण जाहिर केले जात नाही तोपर्यंत माघार नाहीच, असा इशाराच सरकारला भांबेरी गावातील महिला, मुली, तरूण, पुरुष मंडळीने दिला आहे.
गावच बसणार उपोषणाला
सरकारने भांबेरी गावकर्यांनी दिलेल्या मागण्या 7 ऑगस्टच्या आत तातडीने मंजूर कराव्यात, नसता 8 ऑगस्टपासून भांबेरी गावात आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत, आणि या आंदोलनात संपूर्ण गावच सहभागी होणार आहे व परिसरातील गावेही हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत,असा खणखणीत इशाराच भांबेरी गावकर्यांनी सरकारला दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.