आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषद:बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे जालन्यात संविधान परिषद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे संविधान परिषद घेण्यात आली. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. बी. एम.साळवे, जय भीम सेनेचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे, राजेंद्र राख, हिंदू महासभा नेते धनसिंह सुर्यवंशी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, श्याम सिरसाट, महेंद्र रत्नपारखे, रोहिदास गंगातिवरे, डॉ. जी. एम. मानकरी, प्रा. शिवाजी लहाने, प्रा. अरविंद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रमोद खरात, संतोष मदन आदींची उपस्थिती होती.

या वेळी अॅड. माने म्हणाले की, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व तसेच सनदी अधिकारी संविधानची शपथ घेऊन आपला पदभार सांभाळतात. परंतु भारतीय संविधानाच्या प्रति देशाच्या व जनतेच्या प्रति इमानदारीने काम करत नाहीत.

त्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार निर्माण होत आहे. यावेळी सत्यजित पाईकराव, सुनील शिंदे, अनिकेत बोर्डे, राजू गवई, विशाल गायकवाड, विल्सन वाघमारे, सुमित सपकाळ, प्रकाश शेळके, अॅड. राजू पाखरे, निवृत्ती शिंदे, बी. एस. बोर्डे, भास्कर घेवंदे, संजय हेरकर, विलास रत्नपारखे, किरण साळवे, रणजीत रत्नपारखे, संदीप जोगदंड, सागर खंडागळे, शेख शफी शेख मिया, मोसिन पटेल, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...