आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:संविधान साक्षरता अभियान प्रचार व प्रसाराची मोहीम

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरो इंडिया, मुंबई व सहारा सामाजिक विकास संस्था,जालना यांच्या सयुंक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील निवडक शाळा,महाविद्यालय व सामाजिक संस्थाच्या सहभागाने “संविधान साक्षरता अभियान’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत भारतीय संविधानाचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक यांच्या सोबत संविधानिक मूल्य रुजवणूक आणि बळकटीकरणासाठी विविध उपक्रम आयोजित करुन राज्य घटनांची जनजागृती करण्यात येत आहे .अशी माहिती अभियान समन्वयक तथा संविधान प्रचारक बिसमिल्ला सय्यद यांनी दिली.

आपण भारतीय स्वतंत्राचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. आतापर्यंत भारतीय संविधानचा चालत आलेला प्रवास हा उल्लेखनीय तर आहेच. येणाऱ्या काही वर्षात संविधानालाही लागु होऊन ७५ वर्षे होतील. माञ ज्या ध्येय प्राप्तीसाठी हि वैधानिक मूल्य रुजविण्यासाठी मांडणी केली गेली ती संवैधानिक, नागरी, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय मूल्य त्या पध्दतीने या भारतीय समाजात रुजलीच नाही. म्हणून आपण सर्व मिळून येणाऱ्या काळात भारतीय राज्यघटना जन-माणसात पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा हा मानस आहे.

विद्यार्थी व युवक हा समाजात राहणारा, वावरणारा व संपूर्ण समाजाला आपल्या वाढत जाणाऱ्या ज्ञान, आकलन, गुणवत्ता व अनुभवाने समाजाकडे वेगळ्या व चौकस दृष्टीने बघणारा घटक आहे. विद्यार्थ्याची आपली एक वेगळी वैचारिक, सामाजिक,अार्थिकदृष्टी असते. आजचे विद्यार्थी व युवक हेच उद्याचे नागरिक, देशाचे उज्वल भविष्य असतात त्यामुळे त्यांच्यात वैधानिक मुल्य रुजविणे म्हणजे समाजाला एका परिपक्व संविधानिक समाजिक क्रांतीच्या उद्दिष्ठासाठी तयार करणे होय. जालना जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालये व गावपातळीवर “संविधान जागृत मंच “ ची स्थापना करुन संविधानचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी युवक,महिला,नागरिकांनी संविधान साक्षरता अभियान मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन बिसमिल्ला सय्यद यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...