आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:"जादूटोण्याचे प्रकार आढळल्यास पोलिसांशी करा तत्काळ संपर्क'

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जादूटोण्याचे प्रकार आढळल्यास जनतेने तत्काळ जवळच्या पोलिस स्थानकात याबाबतची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त समाजकल्याण अमित घवले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर. एन चिमिंद्रे, एस. जे. चौधरी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी अधिनियम २०१३ जारी करण्यात आलेला आहे. या कायद्याची परिणामकारक व योग्य अंमलबजावणीसाठी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार समितीची स्थापना करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...