आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईमुळे त्रस्त:सततच्या इंधन दरवाढीने शेतकऱ्यांचे शेती करण्याचे नियोजन कोलमडले, शेती पडीक ठेवण्याची वेळ, शेतमालाला भाव मिळेना

पिंपळगाव रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतकरी शेतात वखरणी, नांगरणी, डवरणी बैलजोडीने न करता ट्रॅक्टरने करुन घेत आहे. परंतु मागील काही महिनाभरापासुन युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधन दरवाढ झाल्याने याचा सर्वाधिक मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. भाडेतत्त्वावर शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी नांगरणी वखरणी, रोटावेटर , जमीन सपाटीकरण इत्यादी विविध कामांच्या दरात एकरी पाचशे ते सहाशे रुपयाचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती करताना नाकी नौ येत आहे.

तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात शेतीच्या कामाचा यांत्रिकीकरणावर जोर दिसून येत आहे. पूर्वी मोठ्या शेतकऱ्यांकडे दोन ते चार बैल जोड्या तर लहान अल्पभूधारक शेतकऱ्याकडे सुद्धा किमान एक बैल जोडी तरी असायची. त्यामुळे प्रत्येक शेतक-याकडे बैलजोडी असल्याने शेतीची सर्व कामे बैलजोडीने केली जात होती. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने व डिझेल आणि पेट्रोलचे भावात भरमसाठ वाढ झाल्याने शेतीच्या मशागती खर्चात वाढ झाली आहे.

आज यांत्रिक स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टर उधारीत किंवा अत्यल्प पैशात मिळत असल्याने.अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा ट्रॅक्टर आला आहे. त्यामुळे शेतीत एक पीक काढले की त्यावर तीन पीक घेण्याची शेतकऱ्यांची तयारी सुरू होते. ट्रॅक्टर सोबत विविध अवजारे व साहित्य साधनांचा वापर होत असून त्यासाठी डिझेल वापरले जाते . यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची व परिश्रमाची बचत होत असली तरी इंधन दरवाढीने शेतीसाठी लागणारा खर्च भरमसाठ वाढला आहे . सध्या युक्रेन रशियामध्ये गत एक महिन्यापासून करणाऱ्या युद्ध सुरू असून त्याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे.

तसेच डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनी नांगरणी वखरणी रोटावेटर यासह विविध कामांचे दर वाढविले आहे. जे काम पाच वर्षांपूर्वी पाचशे रुपये ऐकराने किंवा पाचशे रुपये तासाने केल्या जायचे त्या कामाचे दर आता हजार ते दोन हजार रुपयांवर गेल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेती मशागत करणे फारच अवघड झाली आहे. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी परेशान आहे. त्यातच गगनाला भिडलेली महागाई यामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे.

दरम्यान, गत चार ते पाच वर्षापासून शेतकरी नापिकीने त्रस्त असून यावर्षी शेतमालाचे भाव जरी चांगले असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्याला त्याचा फायदा न होता त्याची झोळी रिकामीच आहे.त्यातच यावर्षी मशागतीचे दर वाढल्याने शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. बाजारात शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक परेशान आहे. शासनाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. पिंपळगाव रेणुकाई शिवारात ट्रॅक्टरने शेतीची कामे केली जात आहेत.

इतर सेवांचेही दर कडाडले
डिजेलच्या दरात कमालीची वाढ झाली असल्याने शेती मशागतीच्या दरात देखील नाईलाजाने वाढ करावी लागली आहे. कमी दरात ट्रॅक्टर चालवणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांकडून एकरी सतराशे रुपये एकरा प्रमाणे नागरणी दर घेतल्या जात आहे. शेतकरी वर्गातुन नाराजीचा सुर उमटत असल्याचे पिंपळगाव रेणूकाई येथील ट्रॅक्टर मालक रवी सपकाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...