आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भोकरदन तालुक्यात सतत सर्व्हर डाऊन; स्वस्त धान्य वितरणास होतोय विलंब

भोकरदन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थींना धान्य वाटपास सुरुवात केली. गेल्या १० ते २० दिवसांपासून ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे स्वस्त वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. ऑक्टोबरचे धान्य नोव्हेंबर महिन्यात वाटप करण्याची वेळ आली आहे.

सर्व्हर चालत नसल्याने एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते. पॉस मशिनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे.

तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह २०८ स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. ऑक्टोबर महिना संपला तरी ही ऑक्टोंबरचे धान्य नोव्हेंबरमध्ये वाटप सुरू आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा लागत आहेत. तर मजुर वर्ग धान्यासाठी मजुरीला न जाता दुकानासमोर रांगा करून रोज उभारत आहेत.

एकीकडे रोजगार बुडतो तर, दुसरीकडे धान्यही मिळत नाही. अनेक ठिकाणी रेशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. मात्र वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे धान्य वितरणाचे काम जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे, तसे होताना दिसून येत नाही. परिणामी लाभार्थी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. या समस्येकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...