आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:दर्जा सुधारण्यासाठी प्राध्यापकांचे योगदान; देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांचे तीर्थपुरीत प्रतिपादन

तीर्थपुरी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक अडचणी व आव्हाने असतात. दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकांचे योगदान महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपापल्या विषयाचे अद्यावत ज्ञान संपन्न करून महाविद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी उत्तम प्रकारे बृहत् आराखडा तयार केल्यास दर्जा सुधारण्यासाठी फायदा होईल, असे प्रतिपादन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. टी. देशमुख यांनी केले.

तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या मार्फत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पुनर्मूल्यांकन दृष्टीने ‘पुनर्मान्यता समजून घेणे आणि आव्हाने’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक डॉ. शिवराज लाखे यांची उपस्थिती होती.

मूल्यांकनासाठी यूजीसीने ठरून दिलेली निकषांवर अभ्यास करावा मागील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करावा तसेच काळानुरूप होणाऱ्या बदलामुळे अनेक गोष्टी नवीन तंत्रज्ञान नवीन शैक्षणिक धोरण येत असल्याने सर्वांनी अपडेट असणे गरजेचे आहे असे डॉ. देशमुख म्हणाले. यावेळी डॉ. भगवानसिंग बैनाडे, प्रा. रमेश जोगदंड, डॉ. प्रबोधन कळंब, डॉ. रामलिला पवार, डॉ. प्रदीप लगड, डॉ. कल्पना विटोरे, डॉ. अंकुश चव्हाण, डॉ. सुधाकर गिरे, प्रा. अतुल भालेकर, प्रा. डी. सी. खोजे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, प्रा. अमोल कुकडगावकर, प्रा. गाढवे यादव, प्रा. पी. बी. जाधव आदी होते.

बातम्या आणखी आहेत...