आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभरणी:राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान : पंडित

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाभरणी पक्की असेल, तर मजबूत इमारत उभी राहते. त्याच प्रमाणे मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षक हेच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, भविष्याचा वेध घेण्यासाठी चांगला दृष्टीकोन विकसित करतात. ज्यातून सशक्त नागरिक निर्माण होत असल्याने राष्ट्राच्या जडण - घडणीत शिक्षकांचे योगदान सदैव महत्त्व पूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन धम्म दीप संघाचे सरचिटणीस के. बी. पंडित यांनी केले.

शिक्षक दिनी धम्म दीप संघातर्फे सोमवारी जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी रामदास जोहिरे हे होते. आनंद पंडित, पद्मनाथ क्षिरसागर, शीलाताई वाहूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कुसुमाकर (विजय) पंडित यांनी गुरु -शिष्याची पवित्र परंपरा हा भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण हिस्सा असून शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती शक्य नाही.

अशी धारणा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची होती. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या शिक्षकांच्या प्रति समाज सदैव कृतज्ञ राहील असे कुसुमाकर पंडित यांनी नमूद केले. सूत्रसंचालन ईच्छाराम पाटील यांनी केले, तर इलियास शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जवाहरलाल नेहरू विद्यालय, म. ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह, राहुल बालवाडी मोदीखाना, अब्दुल हमीद बालवाडी, राहुल बालवाडी भीमनगरचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...