आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत शिवार:पावसामुळे मक्याची कणसे शेतात; सोयाबीन काढणे, रब्बीची पेरणी सुरू

टेंभुर्णी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि परिसरात पावसामुळे शेतीची कामे गत आठवड्यात मंदावली होती. दरम्यान, पावसाने उघडीप देताच शेतीकामांनी वेग घेतला आहे. पावसापूर्वी मोडून टाकलेली मक्याची कणसे शेतात अजूनही पडून आहेत. शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणे व रब्बी हंगामातील पिकांच्या शेतीसाठी मशागतीसह पेरणीकडे कल दिसून येत आहे.

कापूस वेचणीच्या कामा नाही परिसरात वेग घेतला असला तरी मजुरा अभावी कापूस वेसणी मंदावली आहे सद्यस्थितीत शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये गुंतला आहे. गहू, हरभरा व शाळूची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात राबतांना दिसत आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हिवाळी मकाची ही लागवड केली जात आहे. दरम्यान खरिपातील मका शेतात असतानाही शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या मकाची सोंगणी काढणी सुरू केली आहे. शेतात खुडणी केलेल्या मकाची गंजी टाकण्याचे कामही ठिकठिकाणी सुरू आहे. दरम्यान रब्बी हंगामातही टेंभूर्णी आणि परिसरात मकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होताना दिसत आहे.

मका लागवडीचे काम वेगात
खरिपातील मका यावर्षी नुकसानग्रस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन घटले, परंतु परिसरात ओढ्यानाल्यांना व विहिरींना मुबलक पाणी असल्याने रब्बीतील मका लागवडीकडे आमचा कल वाढला आहे. यामुळे सद्य:स्थितीत मक्का लागवड करीत असल्याचे शेतकरी ठकसेन उखर्डे यांनी सांगितले.

मक्याची सोंगणी काढणी सुरू
पावसामुळे खरिपातील मक्याची सोंगणी लांबणीवर पडली होती. दरम्यान पावसापूर्वी खुडणी केलेल्या मक्याची कणसे जमा करून गंजी घालण्याचे काम सुरू आहे. याशिवाय शेतात मकाचा चाराही जमा केला जात आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर मका काढण्याचे काम केले जाईल. विठ्ठल जोशी, शेतकरी, टेंभुर्णी

बातम्या आणखी आहेत...