आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:कोरोना बळींच्या खिशातून अन् बँक खात्यातून पैसे केले लंपास

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृताच्या खिशातील रोख ४२ हजार रुपये, चांदीची अंगठी, एटीएम, आधार, पॅन व मतदान कार्ड लंपास

सिव्हिल हॉस्पिटलमधील मृताच्या खिशातील रोख ४२ हजार रुपये, चांदीची अंगठी, एटीएम, आधार, पॅन व मतदान कार्ड काढून घेत मोबाइलच्या साह्याने फोन पेवरून ६८०० रुपये सुद्धा लंपास केल्याची घटना १५ एप्रिलला घडली. याप्रकरणी नातेवाईक बुधवारी सकाळी तक्रार नोंदवण्यास गेले असता, कदीम पोलिसांनी तोंडी माहितीवरून आरोपींना ताब्यात घेतले.

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद न करता प्रकरण आपसात मिटवा, असे म्हणून नातेवाइकांना बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले व त्यानंतर घरी पाठवून दिले. यामुळे संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी सकाळी एएसपींकडे दाद मागितली. तेथून आदेश आल्यावर अखेर ५ तासांनंतर कदीम पोलिसांनी फक्त तक्रार घेतली.

यातील मृताचे तिसऱ्या दिवशीचे विधी पार पडल्यानंतर त्यांचा मोबाइल पाहिल्यावर त्यातील फोन पेच्या माध्यमातून ६८०० रुपये ऑनलाइन दुसऱ्याच्या खात्यात वळते केल्याचे लक्षात आले. तसेच खिशातील ४० ते ४२ हजार रुपये व इतर कागदपत्रेही गायब होती.

बातम्या आणखी आहेत...