आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजनच्या अडचणीत मेटारोलने शोधला पर्याय:स्टील प्रोसेसिंग ‘झीरो ऑक्सिजन’वर, इलेक्ट्रिक कटरचा प्रयोग; वाढत्या मागणीने उद्योगांचे ऑक्सिजन गोठवले

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेटारोल मध्ये आशाप्रकारे प्लाजमा कटरचा वापर केला जात आहे.

कोरोनामुळे सध्या रुगणालयांमधून ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी लक्षात घेता उद्योगांचे ऑक्सिजन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांची मोठी अडचण झाली आहे. जालन्यातील स्टील कारखान्यांचाही ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आल्याने स्टील उद्योजकांसमोर नवीच समस्या उभी राहिली आहे. दरम्यान, या प्रतिकूल परिस्थितीत जालन्यातील ‘मेटारोल स्टील’ने यावर पर्याय शोधला आहे. स्टील प्रोसेसिंगसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन कटरऐवजी मेटारोलमध्ये आता इलेक्ट्रिक कटरचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे आता किमान स्टील प्रोसेसिंगचे काम तरी ‘झिरो ऑक्सिजन’वर आले आहे.

जालना शहराची ओळख देशभरात ‘स्टील हब’ म्हणून झाली आहे. दर्जेदार स्टील उत्पादन करताना जालन्यातील उद्योजकांनी यात सातत्याने नव्या संशोधनाची भर घातली आहे. २०१३ च्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तेव्हा बिलेट्स थंड करण्यासाठी अत्यंत कमी पाण्याचा वापर करण्याचे तंत्रज्ञान या उद्योजकांनी शोधले. आता कोरोनामुळे रुगणालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे औद्योगिक वापराच्या ऑक्सिजनवर बंदी आणण्यात आली आहे. स्टील उद्योजकांसाठी हा निर्णय अत्यंत अडचणीचा होता. कारण, भंगारावर प्रक्रिया करताना ऑक्सिजन आणि एलपीजी गॅस कटरचा वापर केला जातो. शिवाय हॉट मेटल व्हेसल क्लिनिंगसाठीही ऑक्सिजन आवश्यकच आहे.

आता ऑक्सिजन पुरवठाच बंद करण्यात आल्याने भंगारावर प्रक्रिया कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जालन्यातील ‘मेटारोल’ स्टीलचे संचालक द्वारकाप्रसाद सोनी यांनी आपल्या कारखान्यातील अभियंते आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला. यात गॅस कटरऐवजी इलेक्ट्रिक अर्थात विजेवर चालणाऱ्या प्लाज्मा कटरचा वापर करता येईल का याची चाचपणी करण्यात आली. त्यासाठी कटर आणि आवश्यक ब्लेड्स मागवण्यात आल्या आणि हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

इतरांनाही आयडिया शेअर
इलेक्ट्रिक प्लाज्मा कटरचा वापर यशस्वी झाल्याने स्क्रॅप प्रोसेसिंग विभागात झीरो ऑक्सिजन ही संकल्पना शक्य झाली आहे. हॉट मेटल व्हेसल क्लिनिंगसाठी ऑक्सिजन नसल्याने व्हसेलची संख्या वाढवली आहे. मेटारोलमध्ये आम्ही केलेला हा नवा प्रयोग इतर उद्योजकांसोबत मी शेअर केला आहे. त्यांनीही या पध्दतीने काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. टीमने गरजेतून हा शोध लावला आहे. तो आजच्या परिस्थितीत उपयुक्त आहे. डी. बी. सोनी, संचालक, मेटारोल स्टील

जालना शहराची ओळख देशभरात ‘स्टील हब’ म्हणून झाली आहे. दर्जेदार स्टील उत्पादन करताना जालन्यातील उद्योजकांनी यात सातत्याने नव्या संशोधनाची भर घातली आहे. २०१३ च्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तेव्हा बिलेट्स थंड करण्यासाठी अत्यंत कमी पाण्याचा वापर करण्याचे तंत्रज्ञान या उद्योजकांनी शोधले. आता कोरोनामुळे रुगणालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे औद्योगिक वापराच्या ऑक्सिजनवर बंदी आणण्यात आली आहे.

स्टील उद्योजकांसाठी हा निर्णय अत्यंत अडचणीचा होता. कारण, भंगारावर प्रक्रिया करताना ऑक्सिजन आणि एलपीजी गॅस कटरचा वापर केला जातो. शिवाय हॉट मेटल व्हेसल क्लिनिंगसाठीही ऑक्सिजन आवश्यकच आहे. आता ऑक्सिजन पुरवठाच बंद करण्यात आल्याने भंगारावर प्रक्रिया कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जालन्यातील ‘मेटारोल’ स्टीलचे संचालक द्वारकाप्रसाद सोनी यांनी आपल्या कारखान्यातील अभियंते आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला. यात गॅस कटरऐवजी इलेक्ट्रिक अर्थात विजेवर चालणाऱ्या प्लाज्मा कटरचा वापर करता येईल का याची चाचपणी करण्यात आली. त्यासाठी कटर आणि आवश्यक ब्लेड्स मागवण्यात आल्या आणि हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता मेटारोलच्या स्क्रॅप प्रोसेसिंग विभागात ऑक्सिजनची गरज नसल्याचे या विभागाचे प्रमुख डी. बी. चव्हाण यांनी सांगितले. जालन्यातील स्टील उद्योगावर ३० ते ३५ हजार कामगार प्रत्यक्ष-प्रत्यक्ष अवलंबून आहेत. येथील स्टील उद्योग अडचणीत आले तर कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. लॉकडाऊन असला तरी कामगार परत आपल्या राज्यात परतू नयेत म्हणून उद्योजकांना मोठी कसरत करावी लागते. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांतून परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतले असताना जालन्यातील कामगारांनी अद्याप स्थलांतर केलेले नाही.

उत्पादन झाले कमी
स्टील हब असलेल्या जालन्यातील स्टील कारखान्यांमध्ये दररोज जवळपास दहा हजार टन स्टील उत्पादन होते. सध्या कोरोनाचे संकट आणि ब्रेक द चेनच्या माध्यमातून बरेच निर्बंध असल्याने उत्पादन तीन हजार टनांपर्यंत कमी झाले आहे. स्टील कारखाने पूर्ण क्षमतेने चालतात तेव्हा दररोज जवळपास एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची गरज असते. सध्या उत्पादन कमी असल्याने किमान दोनशे सिलिंडर मिळावेत अशी येथील उद्योजकांची अपेक्षा आहे.

असा होतो ऑक्सिजनचा वापर
जालन्यात प्रत्यक्ष स्टीलच्या उत्पादनात कुठेच ऑक्सिजन वापरला जात नाही. परंतु स्क्रॅप प्रोसेसिंग आणि व्हेसल क्लिनिंग या दोन कामांसाठी ऑक्सिजनचा प्रामुख्याने वापर केला जातो. काही उद्योग बेसिक ऑक्सिजन फर्नेस अर्थात ऑक्सिजनवर चालणारी भट्टी वापरतात. त्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो. जालन्यात फर्नेसचा वापर करतात. त्यामुळे देशातील इतर स्टील उद्योगांशी तुलना करता स्टील कारखाने पूर्ण क्षमतेने चालताना रोज एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची गरज

मेटारोलने काय केले?
औद्योगिक वापराच्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने मेटारोलने प्रोसेस स्क्रॅप घेण्यावरच भर दिला. त्याशिवाय ज्या स्क्रॅपवर प्रोसेस करावी लागणार आहे त्यासाठी ऑक्सिजन कटरऐवजी इलेक्ट्रिक प्लाजमा कटरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, तर हॉट मेटल व्हेसल क्लिनिंगसाठी जो ऑक्सिजन वापरावा लागतो आहे तिथे व्हेसल क्लीन करण्याऐवजी व्हेसलची संख्या वाढवली आहे. यामुळे स्क्रॅप प्रोसेस विभागात झीरो ऑक्सिजनवर काम चालते आहे, तर व्हेसल क्लिनिंगसाठी ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...