आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरण:राज्यात 511 आरोग्य संस्थांमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण, आठ लाख कर्मचाऱ्यांना लस

जालना / बाबासाहेब डोंगरे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येकी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश

देशभरात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. यात महाराष्ट्रातील ५११ आरोग्य संस्थांची लसीकरण केंद्रे म्हणून निवड करण्यात आली असून प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

कोरोना प्रतिबंधाक लसीकरणाची रंगीत तालीम २ व ८ जानेवारीला राज्यात झाली. यानंतर केंद्राने लसीकरण १६ जानेवारीला सुरू हाेणार असल्याचे घाेषित केले. यानुसार राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी शनिवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून लसीकरण केंद्रांची यादी मागवली.

पल्स पोलिओ मोहीम ढकलली पुढे : १७ जानेवारी रोजी देशभरात नियोजित पल्स पोलिओ मोहीम होती. मात्र, तत्पूर्वी १६ जानेवारीला कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने दोन्ही मोहिमांतील कामाचा अतिरिक्त ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडू नये यासाठी पल्स पोलिओ मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

आठ लाख कर्मचाऱ्यांना लस
सर्व जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांत १६ जानेवारी रोजी लसीकरणाला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात आठ लाख कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. १६ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरण मोहीम यशस्वी होईल. -राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र.

बातम्या आणखी आहेत...