आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:शनिवारच्या आठवडी बाजारात कापूस‎ भाव गडगडले, शेतकरी हवालदिल‎

भोकरदन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी‎ साठवून ठेवलेल्या कापसाला‎ अजूनपर्यंतही अपेक्षित भाव मिळालेला‎ नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरशः‎ हवालदिल झालेले आहेत. शनिवारच्या‎ आठवडी बाजारात चांगल्या कापसाला‎ ७ हजार ८०० रुपये क्विंटल प्रमाणे भाव‎ देण्यात आला तर फरदाडच्या कापसाला‎ सहा हजार पेक्षाही कमी भावाने‎ व्यापाऱ्यांनी खरेदी केली.‎ कोणत्याही शेतमालाला अपेक्षित भाव‎ नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.‎ यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याने किमान दहा‎ हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळेल या‎ अपेक्षेने आपल्या शेतात पिकविलेल्या‎ कापूस घरात साठवून ठेवलेला आहे‎ बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस अजूनही‎ विकलेला नाही. संक्रांतीनंतर कापसाला‎ चांगला भाव मिळेल ही सर्वांना अपेक्षा‎ होती. मात्र सर्वांच्याच अपेक्षा फोल‎ ठरल्या. याविषयी भोकरदनच्या कापूस‎ व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी‎ सांगितले की, जागतिक मंदीमुळे कापुस‎ गठानीला मागणी नाही.

परिणामी‎ कापसाच्या भावात सुधारणा झालेली‎ नाही शेतकऱ्यांना किमान दहा हजार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रुपये क्विंटल भाव मिळेल अशी अपेक्षा‎ होती मात्र अद्याप पर्यंत दहा हजाराचे‎ भाव कापसाचे झालेले नाही. भोकरदन‎ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की‎ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आजही‎ कापूस साठवून ठेवलेला आहे. आता‎ शेतकऱ्यांची कापूस सांभाळण्याची‎ स्थिती नाही. कारण प्रत्येकालाच आपले‎ देण्याघेण्याचे व्यवहार करण्याची बाकी‎ आहे. घरातील लग्न कार्य आधीचे‎ नियोजन ही कापसाच्या पैशावर केले‎ जाते. मात्र अपेक्षीत भावाढ होत‎ नसल्याने शेतकरी यावेळी पूर्णतः‎ हवालदिल झालेले आहेत. साठवून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ठेवलेल्या कापसाला पिसवा लागत‎ असल्याने त्यामुळे कापसाच्या गंजीच्या‎ संपर्कात आलेल्या घरातील व्यक्तींच्या‎ अंगाला खाज सुटते त्याचा सर्वांना त्रास‎ होत आहे.

पैशाच्या कामासाठी नडलेले‎ शेतकरी आजच्या स्थितीत मिळेल त्या‎ भावाने कापूस विक्री करीत आहेत.‎ शनिवारी आठवडी बाजारामध्ये ७८००‎ रुपये क्विंटल प्रतिभाव कापसाला‎ मिळाला आहे. गेल्या पंधरा ते वीस‎ दिवसापासून कापसाचे भाव आठ हजार‎ रुपये क्विंटलच्या आत मध्येच आहेत.‎ कापसाप्रमाणेच इतर शेतमालालाही‎ अपेक्षित भाव मिळालेला नाही. रब्बी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हंगामात उत्पादन झालेल्या हरभऱ्यालाही‎ खुल्या बाजारात साडेचार हजार रुपये‎ क्विंटलचा भाव मिळत आहे.‎ त्याचप्रमाणे सोयाबीनचे भाव ही पाच‎ हजार ते ५३०० च्या आत मध्ये‎ स्थिरावलेले आहे तर नवीन उत्पादित‎ झालेल्या गव्हाला दोन हजार ते २२००‎ रुपयांचा भाव मिळत आहे. दरम्यान,‎ कापसाच्या भावात सध्या मंदी आहे.‎ शेतकऱ्यांनी कापूस घरी साठवून‎ ठेवलेला आहे. सध्या कापसाला आठ‎ हजार रुपयांच्या आत मध्येच प्रति‎ क्विंटल भाव असल्याचे कापूस व्यापारी‎ विष्णू शिंदे यांनी सांगितले.‎

कापसाच्या भरवश्यावर‎ आर्थिक व्यवहार ठप्प
यावर्षी कापसाला अपेक्षित भाव‎ अद्यापपर्यंत आलेले नाहीत. कापसाच्या‎ भरवशावर आर्थिक व्यवहार ठप्प‎ झालेले आहेत. मार्च महिन्यात‎ देण्याघेण्याचे काम पूर्ण करण्यासाठी‎ मिळेल त्या भावात कापसाची विक्री‎ करावी लागत आहे. दहा हजार रुपयाची‎ अपेक्षा असताना अजूनही कापसाला‎ योग्य भाव मिळाला नाही, असे शेतकरी‎ प्रकाश पिसे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...