आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Counterfeit Pesticides Found In Two Agricultural Centers In Jalna District; A Case Has Been Registered Against Two Agricultural Service Center Operators In Chandanjira Police Station |marathi News

गुन्हेवृत्त:जालना जिल्ह्यात दोन कृषी केंद्रात आढळली बनावट कीटकनाशके; दोन कृषी सेवा केंद्रचालकांवर चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दोन कृषी सेवा चालकांविरोधात भरारी पथकाने शनिवारी कारवाई केली. यात १ लाख १७ हजार रुपये किमतीची कीटकनाशके जप्त केली.

कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नवीन मोंढा जालना येथील कृषिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेस जालना व कृषिमित्र कृषी सेवा केंद्र मानदेऊळगाव (ता. बदनापूर) येथे बनावट कीटकनाशके विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे जात पथकाने तपासणी केली. या वेळी बनावट कीटकनाशके विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. त्याची किमत १ लाख १७ हजार रुपये आहे. गुण नियंत्रण निरीक्षक विशाल गायकवाड, बदनापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सरकटे यांच्या फिर्यादीवरून कृषिपुत्र अॅग्रो एजन्सी आणि कृषिमित्र कृषी सेवा केंद्रचालक बाळासाहेब ढोरकुले, शरद शिंदे या दोघांविरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...