आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:भोकरदन येथे ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी 11 टेबलवर होणार

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून मतदान यंत्रातून तीस गावांचे जनतेने निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य व २८ सरपंच बाहेर येणार आहेत. गावाला नवीन कारभारी मिळणार आहेत.

तालुक्यात एकूण ८७.३८ टक्के मतदान झाले. १८१५७ पुरुष, तर १६२३७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतींचे निवडणुका झाल्या. दोन ग्रामपंचायती सरपंचासह सदस्य ही बिनविरोध निवडणूक आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतमोजणी नगरपरिषद मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी ११ टेबलवर दहा फेऱ्या पूर्ण होणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत तहसीलदार सारिका कदम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...