आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेज:कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ‎‎

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी व धुलिवंदनाचा सण अवघ्या‎ काही दिवसांवर येऊन ठेपल्याने‎ खरेदी करिता ग्राहकांची लगबग सुरु‎ झाली आहे. जालना बाजारात‎ विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, कलर‎ ब्लास्टर, सिलिंडर स्प्रे रंग,‎ लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या‎ विविध प्रकारच्या पिचकाऱ्या‎ बाजारात विक्रीस दाखल झाल्या‎ आहेत. यात कार्टून्सच्या‎ पिचकाऱ्यांसाठी लहान मुलांमध्ये‎ क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.‎ जालना बाजारात सध्या भारतीय‎ बनावटी साहित्य उपलब्ध आहे.‎ गतवर्षी पेक्षा यंदा दर १५ ते २०‎ टक्क्यांनी वाढले असल्याचे मत‎ व्यापारी यांनी व्यक्त केली आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सध्या नैसर्गिक रंगाला अधिक‎ मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक‎ रंग २० ते २५० तर ओले रंग १५० ते‎ २०० रुपयांवर उपलब्ध आहेत.‎ तसेच यंदा बाजारात कलर ब्लास्टर,‎ सिलिंडर स्प्रे रंग ही उपलब्ध आहे.‎ बाजारात विविध प्रकारच्या‎ पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये‎ विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्याची‎ क्रेज लहान मुलांमध्ये असते.

पबजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ या खेळाची पिचकारी उपलब्ध‎ असून लहानग्यांमध्ये याची अधिक‎ क्रेज पहावयास मिळत आहेत. यंदा‎ आवाज येणार पिचकारी २५०‎ रुपयांनी उपलब्ध आहे. विविध‎ डिझाइनच्या पिचकारी ४० रूपये ते‎ ६५० रुपयांवर मिळत आहे.‎ होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला‎ ग्राहकांची लगबग सुरु आहे. ग्राहक‎ नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेत. त्याचबरोबर लहान‎ मुलांमध्ये कार्टून पिचकारीची‎ मागणी करीत असल्याचे विक्रेत्यांनी‎ बोलतांना सांगितले आहे. जालना‎ शहरातील गांधी चमन, नुतन‎ वसाहत, छत्रपती शिवाजी महाराज‎ पुतळा, शनिमंदिर, मामा चौक,‎ पाणी वेस, महावीर चौक, महावीर‎ चौक, बसस्थानक रोड आदी‎ परिसरात या दुकाने थाटली आहेत.‎

पिचकाऱ्यांच्या मागणीत‎ यंदा १७ टक्क्यांनी वाढ‎
लहान मुलांच्या पिचकाऱ्यांना‎ जास्त मागणी वाढली आहे.‎ नागरिक, तरुण जास्त करुन रंगाला‎ महत्व देतात. चालू वर्षात‎ गतवर्षीपेक्षा १५ ते १७ टक्क्यांनी‎ पिचकाऱ्यांमध्ये मागणी वाढ झाली‎ आहे. जसा माल तसा खरेदी असते.‎ - संजय गायकवाड, विक्रेता, जालना‎

बातम्या आणखी आहेत...