आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जालन्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या, 26 मोटरसायकल जप्त; जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिकमधील गाड्या

जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच मोटरसायकल चोरांची टोळी पकडली होती. आता पुढील तपासातून पुन्हा भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावातील दोन संशयित मोटरसायकल चोरांना पकडून त्यांच्याकडून 26 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या आरोपींच्या शोधात होती. तपासात माहिती काढत असताना भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावांमधील रामधन स्वरूपचंद बालोद (वय 29) या व्यक्तीने मोटार सायकल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बालोद याला अधिक माहिती विचारली असता त्याने त्याच्या गावातीलच साथीदार पवन प्रताप पिंपळे 25, याच्या मदतीने जालना, औरंगाबाद, नाशिक अहमदनगर अशा विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आणि कुठे? कोणाला? विकल्या त्यांचे पत्तेही दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 26 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. बारा लाख 75 हजार रुपयांच्या मोटरसायकल आहेत .या मोटरसायकल चोरल्याप्रकरणी रामधन बालोद आणि पवन पिंपळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे.

जालना पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, प्रमोद बोंडले, पोलिस कर्मचारी सॅम्युअल कांबळे, सुधीर गायकवाड, सागर बाविस्कर, कृष्णा तगे, गोकुळसिंग कायटे आदींनी हा तपास लावला.

बातम्या आणखी आहेत...