आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:बाणेगाव येथे पीक नुकसानीची केली पाहणी ; आर्थिक नुकसान होत असल्याबाबत निवेदन

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव पंचायत समिती गणात महसूल व कृषी विभागाने संयुक्त पाहणी दौरा करीत मोसंबी फळ गळती तसेच पिक नुकसानीची पाहणी केली. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या मार्फत बाणेगाव पंचायत समिती गणासह घनसावंगी तालुक्यात मोसंबी फळगळती व अल्प पावसाने कापूस, सोयाबीन तुर,मुग, बाजरी सह सर्वच खरीप हंगामातील पिके कुपोषित अवस्थेत आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५० ते ७० टक्के नुकसान होऊन आर्थिक नुकसान होत असल्याबाबत निवेदन दिले होते.

त्याची दखल घेत ३० ऑगस्ट रोजी घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख व उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे, तलाठी अभिजीत देशमुख, कृषी सहायक डोईफोडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर बाणेगाव, सौंदलगाव शिवारात पिकांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, सोयाबीन, कापूस या पिकांची पहाणी केली व पिक नुकसानीचा अहवाल प्रशासनाला सादर करू असे सांगितले. यावेळी लक्ष्मण उढाण, गणेश फलके, जगन्नाथ उढाण, बापुराव जंगले, पांडुरंग शिंदे, दादाभाई उढाण, सुदाम उढाण, पांडुरंग उढाण, परमेश्वर जाधव, पांडुरंग मुळे, किसन चव्हाण, सचिन उढाण, किसन उढाण, अनिरुद्ध उढाण, मुकुंद मुळे, सुनील उढाण, अशोक डोंगरे, बाबा उढाण, सत्यनारायण उढाण, विकास उढाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...