आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे ;जिल्हाधिकारी डॉ. राठोड

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध बँकेतील कर्जासाठीच्या प्रस्तावाची वाढती संख्या पाहता त्याचा निपटारा करण्यासाठी प्रस्ताव तातडीने निकाली काढणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.डीएलसीसीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले की, बँकांना नेमून देण्यात आलेले पिक कर्जाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत.

रब्बी हंगामातील पिक कर्जाचे 100 टक्के उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करावे असे सांगत त्यांनी बँकनिहाय पिक कर्ज वाटपाची सद्यस्थिती जाणून घेत योग्य त्या सुचना केल्या. तसेच पिक कर्जासोबत महिला बचतगट व शासनाच्या विविध महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या योजनेमधील कर्जाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...