आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाफराबाद:संसकारशील समाज शिक्षक घडवू शकतात; माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे प्रतिपादन

जाफराबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, अंतराळ, समाजसेवा, राजकारण तसेच विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हातुन घडत असते म्हणुन ज्ञानदानातुन एक आदर्श व संस्कारशील समाज घडविण्याची भुमिका शिक्षक पार पाडत असल्याचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सांगितले.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले गट समन्वयक वसंता शेवाळे यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कैलास दिवटे, प्रभाकर अवकाळे, विजय बिसेन, रघुनाथ पंडीत, एकनाथ शेवत्रे, विजयकुमार गोफणे, दत्तु अंभोरे, गजानन गोफणे, दिपक चव्हाण, भरत ठोसरे, पंडित, शेख कदिर, भगवान चव्हाण, संतोष अंभोरे, अनिल छडीदार यांची उपस्थिती होती. दानवे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट पिढी घडविणारे शिक्षक असतात ते अनेकांना प्रेरणादायी असतात. तसेच समाजाच्या विकासात तथा जडणघडणीत शिक्षकांचे महत्वपुर्ण योगदान असुन आतापर्यत देशात नावलौकिक मिळविलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती या शिक्षकांनीच घडविलेल्या आहेत. जे विद्यार्थी शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करतात त्या व्यक्ती यशस्वी जीवन जगतात म्हणुन विद्यार्थ्यांनी मनातील न्युनगंड दुर करावा व सकारात्मक दृष्टीकोन अंगी बाळगावा आणि शिक्षकांचा आदर करा व ते क्षणाक्षणाला जे शिक्षण देतात ते शिक्षण शिका त्याचे अध्ययन आणि अंगीकरण करण्याचे आवाहन केले. दरम्यान, जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा येथील वसंतराव शेवाळे,जाफराबाद जिप प्रशालेचे शिवहरी ढाकणे, जानेफळच्या शिक्षिका सविता बरंडवाळ, माहोरा येथील जयकुमार सोनवणे, गणेश पवार, श्रीकृष्णा चेके या सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...