आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावबंदी लागू:जिल्ह्यामध्ये 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजूर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुद्ध विविध कारणास्तव आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको आदी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

हा आदेश कामावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलिस अधीक्षक व सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...