आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:2 एकरांतील 200 मोसंबीची झाडे तोडली; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

सिंधी काळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे दोन वर्षांपासून जपलेल्या दोन एकरातील मोसंबी बागेतील २०० झाडे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून टाकल्याचा प्रकार जालना तालुक्यातील बाजीउम्रद शिवारात रविवारी रात्री घडला आहे. दोन एकरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कलमा कापण्यासाठी बराच वेळ लागतो. या दरम्यान हा प्रकार कुणाच्या नजरेस का पडला नाही, असा संशयही व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही केली आहे.

बाजीउम्रद येथील शिवारात शेतकरी देविदास गणपत लोखंडे यांनी दोन वर्षांपूर्वी २०० मोसंबीच्या कलमा लावल्या. मागील दोन वर्षांतील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे नियोजन करून हाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्याने या कलमा जगवल्या. यासाठी त्यांनी ठिबक सिंचन करून कलमांना पाण्याचे नियोजन केले. दरम्यान, दोन वर्षांत तीन ते चार फुटांपर्यंत वाढ झालेल्या कलमा ५ जूनच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने तोडून टाकल्या आणि त्यांच्या स्वतःच्या विहिरीत टाकून दिल्या. या पिकाला पाण्यासाठी ठिबक तसेच त्यासाठी खते, औषधी देण्यासाठी तयार केलेल्या व्हेंच्युरीचीही तोडफोड केली. दरम्यान, देविदास लोखंडे हे सोमवारी सकाळी झाडांना पाणी देण्यासाठी गेले असता शेतातील संपूर्ण झाडे जमीनदोस्त झालेली दिसली. प्रतिष्ठित नागरिकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. देविदास लोखंडेंंच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...