आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजभान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना वैद्यकीय मदत -कक्षाचे मराठवाडा कक्षप्रमुख दादासाहेब थेटे यांना सानेगुरुजी सेवा सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामकुंवर अग्रवाल, शरद जयस्वाल, अशोक हुरगट, संतोष मुथा, राजेश कामड, दादासाहेब थेटे आदींची उपस्थिती होती.
अशोक हुरगट म्हणाले की, दादासाहेब थेटे यांनी पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, युवाप्रेरणा, शेती संबंधी प्रश्न अशा वेगवगेळ्या विषयावर भरीव काम केले आहे. रामकुंवर अग्रवाल म्हणाले, थेटे हे समाजभान तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने रुग्णसेवेसोबतच रक्तदान, वृक्षारोपण, पालावरची शाळा, पालावरची दिवाळी, माणुसकीची भिंत, गरजू विद्यार्थ्यांना तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व असे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवित असतात. असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.