आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक आरोग्य केंद्र:दहिफळ खंदारे आरोग्य केंद्राला नातेवाइकांनी ठोकले कुलूप

तळणी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी हजर राहत नसल्याने प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेची आवारात प्रस्तुती झाल्याने संतप्त नातेवाईकांनी केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना शनिवारी घडली.

दहिफळ खंदारे येथील ज्योती रामू जावळे या महिलेला शुक्रवारी रात्री १ वाजता प्रस्तुतीसाठी नातेवाईकांनी प्रा. आरोग्य केंद्रात आणले. मात्र, यावेळी केंद्रात डॉक्टर व कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यानंतर काही वेळेनंतर महिलेची प्रस्तुती झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रा. आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. सकाळी काही कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून केंद्रात प्रवेश केल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी सरपंचाच्या उपस्थितीत पुन्हा कुलूप ठोकले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर आवारात बसण्याची वेळ आली.

जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करत कारवाई करणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईक मोहन मस्के, सुनीता मस्के यांच्यासह अनेकांनी घेतला. या आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी आहेत. एक दोन सोडले तर इतर कुणीच नियमित हजर नसतात. वैद्यकीय अधिकारी आठवडयातून कधीतरी एकदा येऊन जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे एकही कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. याकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम मांटे या हजर झाल्या असता त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...