आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वारी जमिनदोस्त:कोल्हेवाडी परिसरात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील कोल्हेवाडी परिसराला बुधवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. पावसाने रब्बी ज्वारीचे जमिनदोस्त झाले असून इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून उष्णता वाढली आहे. तर हवामान खात्याने ही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बुधवारी ( दि. १४) रात्री १०.३० ते मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान केज तालुक्यातील कोल्हेवाडी व परिसरातील पावसाने जोरदार हजेरी लावली. सुसाट वारा असल्याने ज्वारीचे पीक पुर्णपणे जमीनदोस्त झाले.

तसेच हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले. कापूस वेचणीला आलेला असून अवकाळी पावसामुळे त्याचेही नुकसान झाले. खरीपही परतीच्या सततच्या पावसाने गेला होता. त्याच्या नुकसान भरपाईची शेतकरी वाट पाहत आहेत. हे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन निघेल अशी आशा आहे. परंतु यावरही अवकाळी पावसाचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. या नुकसानीची माहिती तलाठ्यांना देण्यात आल्याचे गावकरी चंदु मिसाळ यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...