आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह तालुक्यात मंगळवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला यात वीज कोसळून दोन गाय व एक म्हैस दगावली आहे. या तीनही शेतकऱ्यांचे मिळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे गहू आणि मका पिकासह हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात पेरलेल्या गहू हरभरा पिकासह बहर आलेल्या आंबा फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. मासनपुर येथील शेतकरी सुनील जाधव यांच्या शेतातील गहू आणि मका पीक पूर्णतः आडवे झालेले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांनी त्याने पिकाचे पीक विमा कडून विमा काढलेला आहे ७२ तासाच्या आत कंपनीकडे तक्रार द्यावी. तसेच १८००४१९५००४ या टोल फ्री नंबरवर कॉल करुन तक्रार नोंदवावी, तसेच Pikvima@aicofindia.c om या ईमेल द्वारे आपण कंपनीला पिकाचे नुकसान झालेला फोटो व विमा पावती पाठवून पण तक्रार करू शकता, असे कृषी विभागाने कळवले आहे. दरम्यान, प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसाान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.