आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना आधार:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या ७४ कोटी रुपयांची मिळणार भरपाई

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात भोकरदन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच खरिप पिकाचे नुकसान झाले होते. यात जवळजवळ खरीपातील एक लाख हेक्टरवरील खरीप पिके बाधित झाले होते. या अनुषंगाने भोकरदन महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करीत सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता.यानुसार शासनाने देखील याची गंभीर दखल घेत भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रुपये मंजुर केले आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सदर अनुदान शेतकऱ्यांना लवकर मिळावे, यासाठी महसूल प्रशासनाकडून गतिमान हालचाली सुरू आहेत.

यंदा भोकरदन तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली.त्यामुळे खरिप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती. पंरतु निसर्गाच्या मनात काही औरच असल्याने यंदा देखील सप्टेंबर व आँक्टोबर महिन्यात पावसाने धूमाकुळ घातला. सातत्याने झालेल्या पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात जमिनीत पाणी साचल्याने सोंगणी केलेले सोयाबीन पिके पूर्णतः वाया गेली. शिवाय वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील मका पिक जमिनीवर आडवे झाले.

तर कपाशीच्या शेतात पाण्याचे डोह साचले. त्यामुळे कपाशीच्या केर्या देखील काळवाडंल्या. पिके ऐन घरात येणाच्या काळातच निसर्गाने घाला घातल्याने शेतकरी रस्त्यावर आले. शिवाय अधिक पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणारे मिरची पिक देखील पूर्णतः उद्ववस्त झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी लोकप्रतिनीधी, विविध सामाजिक संघटना, शेतकरी आदिंनी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा सुचना महसुल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार कृषी व महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करुन सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या अनुषंगाने शासनाने दखल घेत भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रूपये मंजुर केले आहे. या अनुदानाचा लाभ ६३ हजार ६५४ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मोठा दिलासा मिळाला
अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरिपात प्रचंड नुकसान झाले होते.त्यामुळे अपेक्षित उत्पादन हाती लागले नव्हते. रब्बी पेरणीसाठी देखील पैशाची वाणवा भासली. आता शासनाकडुन मदत मिळाली आहे.ती आता बँक खात्यात लवकर जमा होऊन आमच्या पदरात पडावी अशी अपेक्षा आहे.शासन मदतीमुळे थोड्या फार अडचणी दुर होऊन दिलासा मिळाला असल्याचे पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी आहे.

गोपाल देशमुख यांनी सांगीतले.
आमदार संतोष दानवे यांचा पाठपुरावा : ऐन काढणीच्या काळात पिकांवर परतिच्या पावसाने घाला घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. सोंगणी केलेले सोयाबीन पुर्णत: काळवंडले तर मका, कपाशीचेही मोठे नुकसान झाले. याची पाहणी आमदार संतोष दानवे यांनी करून महसुल विभागाकडून सर्व नुकसानीची नोंद करण्यापासून ते मदतीपर्यंत आमदार दानवे यांचा पाठपुरावा राहिला आहे.

शासनाकडून ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून ७४ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. लाभार्थी याद्या पण तयार आहे. शासनाकडून निधी जमा झाल्यास तत्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यात येईल. कुठलाही शेतकरी मदतीपासून वचिंत राहणार नाही यांची काळजी घेण्यात येईल. सारीका कदम, तहसीलदार. भोकरदन

बातम्या आणखी आहेत...