आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:दामिनी पथकाचा विद्यार्थिनींशी संवाद ; त्रास देतंय का याची केली विचारणा

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठे छेडछाड, मुलींशी असभ्य वर्तणूक, टवाळखोर मुलींना त्रास देत असतील तर त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तसेच मुलींनी अशा प्रकाराची माहिती दामिनी पथकाला देत राहावी, या अनुषंगाने दामिनी पथकातील अधिकारी, कर्मचारी विविध शाळांतील विद्यार्थिनींशी संवाद साधत आहेत. शुक्रवारी मंठा येथील बसस्थानक परिसरात विविध शाळांतील विद्यार्थिनींशी दामिनी पथकाच्या रंजना पाटील यांनी संवाद साधला.

मुलींची कुणी छेड काढत असतील तर त्यांच्यावर कारवाई होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर पोलिस प्रशासनाकडून दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबी पीआय सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या रंजना पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान, विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी रंजना पाटील या विविध शाळांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधून मोबाइल नंबर देऊन त्यांना कुणी त्रास देतंय का, याची माहिती घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या पथकाने मंठा येथील बसस्थानकात शाळकरी मुलींशी संवाद साधला तसेच मार्गदर्शनही केले.

बातम्या आणखी आहेत...