आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दानकुंवर महाविद्यालयाचे करिअर कट्टा स्पर्धेत यश‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वच‎ महाविद्यालयातून चालवल्या‎ जाणाऱ्या करिअर कट्टा विभागाच्या‎ वतीने गेल्या वर्षभरात केलेल्या‎ कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र‎ राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व‎ महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता‎ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने‎ आयोजित राज्यस्तरीय करिअर‎ कट्टा महाविद्यालयीन स्पर्धेत‎ जालना येथील श्रीमती दानकुंवर‎ महिला महाविद्यालयाने घवघवीत‎ यश मिळवले आहे.‎

उत्कृष्ट जिल्हास्तरीय‎ महाविद्यालय प्रथम क्रमांक, उत्कृष्ट‎ राज्यस्तरीय समन्वयक म्हणून‎ गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ.‎ स्वाती महाजन यांनी द्वितीय‎ क्रमांक, त्याचबरोबर उत्कृष्ट‎ विभागीय महाविद्यालयीन‎ समन्वयक औरंगाबाद विभाग‎ यातूनही प्रथम क्रमांक मिळविला‎ आहे. उत्कृष्ट जिल्हास्तरीय‎ महाविद्यालयीन समन्वयक म्हणून‎ वाणिज्य विभागातील प्रा.अंजू‎ कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक‎ पटकावला आहे.

द्वितीय क्रमांकही‎ डॉ. स्वाती महाजन यांनी‎ मिळविला. व्यवस्थापन समितीच्या‎ वतीने या दोन्हीही प्राध्यापिकांचा‎ सत्कार करण्यात आला. याप्रसंगी‎ संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता,‎ सहसचिव गणेश अग्रवाल, नरेश‎ अग्रवाल, विनोद अग्रवाल, प्राचार्य‎ विजय नागोरी, उपप्राचार्या प्रा.‎ डॉ.विद्या पटवारी, गायत्री शुक्ला,‎ प्रा. डॉ. जितेंद्र अहिरराव, रासेयो‎ कार्यक्रमाधिकारी डॉ. सुधाकर‎ वाघ, डॉ. झेड. बी. काजी, डॉ. बी.‎ जी. श्रीरामे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...