आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातपाताचा आराेप‎:गत सहा वर्षांपासून‎ मुलीसह नात बेपत्ता‎

जालना‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमची मुलगी व नात गेल्या सहा‎ वर्षापासून बेपत्ता आहे. याबाबत‎ पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.‎ परंतू, अजूनही मुलगी सापडली‎ नाही. पती व सासरच्यांनी घातपात‎ केला असावा, असा आरोप वृध्द‎ रामदास चव्हाण, आशा चव्हाण व‎ बेपत्ता मुलीचा भाऊ राजेश चव्हाण‎ यांनी केला आहे.‎ जालना शहरातील नरिमन नगर‎ भागात राहणाऱ्या रामदास चव्हाण‎ यांची मुलगी वर्षा हिचा विवाह ९ मे‎ २००१ रोजी जोडमानेगाव येथील‎ सुरेश आसाराम गायकवाड या‎ युवकाशी झाला होता. सुरुवातीचे‎ काही वर्ष संसार चांगला चालल्याने‎ मुलीच्या वडीलांनी मदत म्हणून‎ मुलीला शहरातील जमुनानगर‎ भागात एक घर विकत घेऊन दिले.‎

सुरेश हा शहरातील एका‎ हॉस्पिटलमध्ये कामाला होता. याच‎ ठिकाणी वर्षा देखील कामाला होती‎ आणि यातूनच त्यांचे प्रेम संबंध‎ जुळले आणि ते नात्यातीलच‎ असल्याने दोन्ही परिवाराने‎ रीतिरिवाजानुसार लग्न लावून दिले.‎ परंतु काही वर्षापुर्वी घर विकून सुरेश‎ गायकवाड पत्नीसह खरपुडी येथे‎ राहावयास गेला. तेव्हापासून‎ आपल्याला मुलीशी किंवा नातीला‎ भेटणे व बोलणे देखील करून दिले‎ नसल्याची तक्रार वृद्ध दांपत्य‎ रामदास चव्हाण आणि त्यांच्या‎ पत्नीने तत्कालीन पोलिस‎ निरीक्षकांकडे केली होती. मुलीला‎ सासरकडचे छळ करत असल्याची‎ तक्रार देखील कौटुंबिक न्यायालयात‎ दिली असल्याचे ते म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...