आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा खून:पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून मुलीचा खून

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षाच्या मुलीला वडिलाने शेततळ्यात टाकून खून केल्याची घटना निधोना रोडवरील एका शेतात २८ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, संशयित आरोपी असलेल्या जगन्नाथ बाबूराव डकले (३०, गव्हाली, ता. सिल्लोड ह.मु.नागेवाडी शिवार, निधोना रोड) याने पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून मुलीचा खून केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

झोक्यात मुलीला झोपी घालण्यासाठी ठेवून नंतर शेतात पती-पत्नी काम करण्यासाठी गेले होते. नंतर काही वेळाने मुलीचे वडील झोक्याकडे आले असता मुलगी नसल्याचे दिसून आले. मुलीला कोणीतरी झोक्यातून नेले, असा बनाव करून चंदनझिरा ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी सखोल तपास केला असता वडिलानेच श्रावणी डकले (दीड वर्ष) हिचा खून केल्याचे समोर आले होते. पहिल्यांदा कौटुंबिक वादातून हा खून केल्याचे समोर आले होते. आता पत्नीच्या संशयावरून हा खून केल्याची संशयित आरोपीने कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, एपीआय सावळे, पीएसआय गणेश झलवार, शिवाजी पोहार आदींनी केला. दरम्यान, घटनेच्या दिवशी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख आदी घटनास्थळी तळ ठोकून हाेते.

बातम्या आणखी आहेत...