आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत मासे:कुंडलिका नदीपात्रात आढळले मृत मासे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधारा ते शहरातून बाहेर रोहनवाडीच्या दिशेस जाणाऱ्या कुंडलिका नदीपात्रात जागोजागी हजारोंच्या संख्येत मासे मृत अवस्थेत पडलेले आहेत. यासंदर्भात सोमनाथ कुरमुडे या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल फोन बंद होता. जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांकडून कुंडलिका नदीपात्रातील पाणी तपासून त्याचा अहवाल मागितला आहे. कुंडलिका नदीपात्रात मोती तलावातील दूषित पाणी मिसळत असल्यामुळेच नदीपात्रातील पाणी पूर्ण विषारी होत आहे. मोती तलावात औद्योगिक वसाहतीतील ट्रक धुण्याचे काम चालते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी रसायने, तेल आणि रासायनिक खतांचा कचरा मोती तलावाच्या सांडव्यातून कुंडलिकेच्या पात्रात मिसळत आहे. ते ताबडतोब बंद करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...