आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ अकस्मात मृत्यूची नोंद:मधमाशांपासून बचावासाठी‎ तळ्यात उडी घेतल्याने मृत्यू‎

मंठा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाकूड तोडत असताना आग्या‎ मोहोळाच्या माशा चावू लागल्या.‎ यानंतर आग्या मोहोळपासून‎ बचावासाठी‎ शेततळ्यात उडी‎ मारली. परंतु,‎पाण्यात बुडून‎ एका व्यक्तीचा‎ मृत्यू झाल्याची ‎घटना मंठा‎ तालुक्यातील‎ जयपूर येथे बुधवारी सायंकाळी‎ घडली. राजाभाऊ श्रीरंग कांबळे‎ (४०, रा.देवळा, ता. परतूर ) असे‎ मृताचे नाव आहे.‎ राजाभाऊ कांबळे हे बुधवारी‎ सायंकाळी जयपूर शिवारातील‎ शेतात काम करीत होते. त्याचवेळी‎ त्यांच्या मागे आग्या मोहोळ लागले.‎ मोहोळपासून बचावासाठी त्यांनी‎ शेततळ्याकडे धाव घेतली.‎

शेततळ्यात उडी मारली. परंतु,‎ आग्या माेहाेळाच्या माश्या त्यांना‎ पाण्याबाहेर येऊ देत नव्हत्या.‎ त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू‎ झाला. ही बाब ग्रामस्थांना समजली.‎ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन‎ याची माहिती सेवली पोलिसांना‎ देण्यात आली. पोलिसांनी‎ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह‎ बाहेर पाण्याबाहेर काढला.‎ घटनास्थळाचा पंचनामा करून‎ पोलिसांनी मृतदेह‎ शवविच्छेदनासाठी पाठविला. या‎ प्रकरणी सेवली पोलिस ठाण्यात‎ अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...