आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:मृत्यू प्रत्येकाला आहे‎ चांगले सत्कर्म करा‎

वाकडी‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणे‎ प्रत्येकाला आहे, मृत्यू, जन्म‎ होणारचं यासाठी चांगले सत्कर्म‎ करा असा उपदेश ज्ञानेश्वर माऊली‎ महाराज शेलूदकर यांनी केला.‎ भोकरदन तालुक्यातील वाकडी‎ येथे जगद्गुरू तुकोबाराय बीज व‎ नाथषष्ठी उत्सवा निमित्त‎ अखंड हरिनाम सप्ताहात‎ सोमवारी ज्ञानेश्वर महाराज‎ शेलूदकर यांची कीर्तन सेवा झाली.‎ प्रत्येकाला मरायचं आहे आणि‎ साधूसंत कधी मरणाला घाबरत‎ नाहीत.

मृत्यू आणि जीवनामध्ये‎ काहीच फरक नाही. मुस्लीम‎ समाजात तीरडीवर बांधत नाही, तर‎ डोलीत नेतात, अशी एक डोली‎ लग्नाची येत होती, तर डोली‎ मृत्यूची जात होती, शादी डोली खुश‎ थी, मृत्यू की डोली गम मे थी, एक‎ बात याद रखना चार तेरे भी है, चार‎ मेरे भी है, चार तेरे भी रो रहे है, चार‎ मेरे भी रो रहे है फरक ईतना है की तु‎ संसार छोडकर जा रहा है, मै संसार‎ मे आ रही हू, प्रमाणे मनुष्याला एक‎ दिवस जग सोडून जावे लागणार‎ आहे. यासाठी यासाठी परमात्माचे‎ स्मरण आणि सत्कर्म केले तर‎ जीवन सुखी समाधानी होईल, असे‎ माऊली महाराजांनी सांगितले.‎ यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...