आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेतून पडल्याने सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील कोडी-सारवाडी जवळ घटना घडली आहे. राहुल मारोती ढगे (३१, पळशी, जि. हिंगोली) असे मृत सैनिकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान, राहुल ढगे यांना रात्रीच मुलगी झाली होती. परंतु, तिचा चेहरा पाहण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला , अशी माहिती तपास अधिकारी राम शिंदे यांनी दिली.
दहा वर्षापूर्वी राहुल सैन्य दलात भरती झाले होते. ते वसमत तालुक्यातील पळशी गावचे रहिवासी हाेते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते रेल्वेतून पडल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल ढगे हे रात्री १ वाजेच्या सुमारास औरंगाबाद- पूर्णा या रेल्वेने पूर्णा येथे जात असताना लोंढेवाडी ते सारवाडीच्या दरम्यान रेल्वेतून खाली पडले. दरम्यान, रेल्वेचे कर्मचारी गस्त घालत असताना अशोककुमार काळूराम वर्मा यांना ते मृत अवस्थेत दिसले. तालुका जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मारुती ढगे यांच्या उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात मृतदेह पाठविला. दरम्यान, ढगे यांचे नातेवाईक दुपारच्या सुमारास जालन्यात पोहोचले आणि त्यांनी जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. दरम्यान नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीने रात्रीच एका मुलीलाही जन्म दिल्याचे सांगितले आहे. वसमत तालुक्यातील पळशी या मूळ गावी त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.