आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कंपनीत स्फोट होऊन जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू ; पोलिस सूत्रांची माहिती

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिकल मशिनरीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन लोखंड वितळणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत घडली. यात गंभीर असलेल्या दोघांपैकी एकाचा बुधवारी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या स्फोटात विवेकुमार रामाश्रय राजभर (२८, बलिया नवादा, उत्तर प्रदेश), अजिंक्य बाळासाहेब काकडे (२१, सिद्धिविनायकनगर, चंदनझिरा, जालना), माहेश्वरी अवदेश पांडे (३०, चितोना, गोपालगंज, बिहार), संतोष मेवालाल (३८, पथराह मिर्झापूर), अजयकुमार सीताराम राजभर (२५, गोठवा बलिया, जि. भलिया, उत्तर प्रदेश), परविंद सिंगासन (धनुवाताी सालेम, जि. भलिया, पचखोरा, उत्तर प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. यातील‌ गंभीर जखमी असलेल्या अजयकुमार राजभर यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...