आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदंश:शेतात सर्पदंश झालेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

गेवराई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.रामेश्वर भागवत लोणकर (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रामेश्वर भागवत लोणकर हे गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील रहिवासी होते. शुक्रवारी आपल्या गावाजवळील शेतात उसाला पाणी देण्यासाठी ते एकटे गेले होते. रात्री अंधारात घोणस या विषारी सर्पाने त्यांना दंश केला असता त्यांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...