आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अधिवेशन:शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्ज लवाद विधेयकाची आवश्यकता

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावकारांनी बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ९० वर्षांपूर्वी कृषी लवाद विधेयक मांडून तत्कालीन सरकारमार्फत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती. आजही या विधेयकाची नितांत गरज असून कृषी विद्यापीठांनी भाऊसाहेबांच्या विचारांवर कार्य न केल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा सूर संशोधक, अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला.

जे . ई. एस. महाविद्यालयात सुरू असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी चंद्रपूर येथील डॉ. शरयू पोतनूरवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक विचार’ या विषयावर तिसरे सत्र झाले. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. भांडवलकर, कार्यवाह प्रोफेसर डॉ. अविनाश निक्कम, प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने, खजिनदार डॉ. मारुती तेगमपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेती व्यवसाय हा राष्ट्राचा प्रमुख आधार असून राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीचा आग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांनी धरला होता. यासाठीच त्यांनी जागतिक पातळीवरचे कृषी प्रदर्शन भरवले, जगातील तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, संघटित झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हा दृष्टिकोन ठेवून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतीय कृषक समाजासह विविध २० संस्थांची स्थापना केली. शिक्षण घेऊन शेती करावी, कुपोषण मुक्तीसह अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विविध देशांत आपले प्रतिनिधी पाठवून तेथील तंत्रज्ञान आत्मसात केले. भाऊसाहेबांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, शेती विषयक कार्य आदी पैलूंवर सहभागी संशोधक, विचारवंतांनी प्रकाश टाकला.

अध्यक्षीय समारोपात डॉ. शरयू पोतनूरवार यांनी हिंदुस्थानच्या कृषी क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना उत्तम बियाणे मिळवण्यासाठी बीज उत्पादन कंपन्यांची स्थापना करून शेती व बाजाराचा योग्य समन्वय साधला. मेक्सिकन गव्हाची लागवड आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले. आज त्यांच्या विचार व कार्यांवर चालण्याची नितांत गरज असून तसे केल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास डॉ. व्यक्त केला.

डाॅ. पंजाबराव देशमुखांच्या जन्मस्थळी विद्यापीठ व्हावे देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी जागतिक पातळीवर भारतीय कृषी मालाची निर्यात व्हावी यासाठी परदेशांत शेतमालाची माहिती दिली. आज अकोला येथे विद्यापीठ असून चंद्रपूर येथे कृषी विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेले पापळ येथे कृषी विद्यापीठ व्हावे, यासाठी अर्थशास्त्र परिषद पाठपुरावा करणार असल्याचेे अध्यक्ष डॉ. भांडवलकर यांनी सांगितले.

शाश्वत रोजगार निर्मितीचे धोरण हवे देशाच्या आर्थिक वृद्धीत शेती क्षेत्र घटत चालले असून औद्योगिक क्षेत्र स्थिर आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानामुळे कुशल रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, हॉटेल, दळणवळण, बूटपॉलिश, फेरीवाले असा मोठा असंघटित, अनिश्चित,असुरक्षित, अस्थिर व अशाश्वत रोजगार वाढला.

बातम्या आणखी आहेत...