आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणोत्सव:पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुकामाता यात्रोत्सवात डीजे मुक्तीचा निर्णय; विविध नियोजनावर बैठकीत झाली चर्चा, महाप्रसादाचे असणार आयोजन

पिं.रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून बंद असलेला भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकामाता याञा उत्सव यावर्षी धुमधडाक्यात आणि नियोजन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शनिवारी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली असुन या बैठकीत डिजे मुक्तीचा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान भव्य अशा महाप्रसादाचे देखील आयोजानाची देखील यावेळी तयारी करण्यात आली.

पिंपळगाव रेणुकाई येथे चैञ महिन्यात रेणुकामातेची याञा भरते. याञेला बाहेरील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. परंतु मागील दोन वर्षापासून देशभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे सगळीकडेच लॉकडाऊन करण्यात आले होते. संचारबंदीचे आदेश लागू असल्याने गर्दी देखील करता येत नव्हती.त्यामुळे सर्वच धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम ग्रामीण भागात देखील पहावयास मिळाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने कोरोना संदर्भातीर सर्व अटी शिथील केल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे.

पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकामातेची याञा देखील दोन वर्षापासून बंद होती. यात्रेस घटस्थापणेने प्रारंभ होणार आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेणुकामाता संस्थान आणि ग्रामस्थाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या वर्षी मातेचा पालखी सोहळा हा पारंपारिक वाद्यात काढण्याचा निर्णय रेणुका माता संस्थाने आयोजित घेतला आहे. शिवाय मल्लखांब, वगदा-वगदी- कुस्तीचे देखील नियोजनावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. याञेची सांगता महाप्रसादाने करण्यात येणार आहे. यासाठी गावातुन शिदा जमा केल्या जाणार आहे. जो कोणी याञेत गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केली जाणार नसल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

मागील दोन वर्षापासून बंद असलेला रेणुकामातेचा याञा उत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होणार असल्याने रेणुकामाता भक्तामध्ये आतापासुन उत्साह शिगेला पोहचला आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख, रेणुकामाता संस्थानचे कडूबा देशमुख, जि. एच, राव, मोतीराम नरवाडे, रामकृष्ण आहेर, गणेशराव देशमुख, पोलिसपाटील गणेश निकम, एस.बी.काळे, संतोष बौर्डै, पंडीत नरवाडे, भगवान बोडके, बाबुराव बेराड, हरिभाऊ बेराड, उत्तमराव नरवाडे, राजु देशमुख, राधाकिसन भोसले, लक्ष्मण आहेर, शिवा आहेर, गणेश देशमुख, सुनील देशमुख, समाधान तायडे, विजय देशमुख, अजय देशमुख, हरिभाऊ आहेर, जिवन गाढे, दत्तु आहेर, रमेश आहेर, संतोष बौर्डै, ईरफान पटेल,अमोल नरवाडे, निवृत्ती गावंडे, बाबु पठाण, सलीम पठाण, समाधान देशमुख, गजानन देशमुख, संतोष जाधव, निलेश दळवी, सुमित मयुरे, शेखर देशमुख आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...