आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंड येथील सम्मेद शिखरजी या जैन धर्मीयांच्या तीर्थस्थळाला झारखंड सरकारने पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यामुळे पवित्र भंग पावणारा असल्याने या निर्णयाविरोधात सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठवले. सदर निर्णय रद्द करून या पवित्र स्थानाला जैन धर्मीयांचे तीर्थस्थळ घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली.
सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे सर्वोच्च स्थान असून ही मोक्षभूमी आहे. या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. पर्यटक जोडप्यासोबत पादत्राणे घालून येतील. कोल्ड्रिंक, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल कुठेही टाकतील. कोणत्याही बंधने नसल्याने मदिरापान करतील, मांसाहार करतील, शिखर मार्गावर सरकार हॉटेल, लॉजिंग, व्यावसायिक दुकानांना परवानगी देईल, परिणामी रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची वर्दळ सुरू राहील.
त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संजय लव्हाडे, अॅड. ऋषभचंद माद्रप, महेंद्र सावजी, माणिकचंद कासलीवाल, अनुप डोणगावकर, योगेश पाटणी, सुदेश सकलेचा, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, शिखरचंद लोहाडे, प्रवीण पहाडे, सुभाष वायकोस, चेतन वायकोस, भरत परितकर, मिश्रीकोटकर, संजय लुणावत, प्रकाश सुराणा, चेतन देसरडा, जय कोटेचा, नरेंद्र सावजी, जितेंद्र माहोरे, सचिन कुरकुटे, प्रभाकर ठोले, संजय ढोले, सुधाकर खुळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.