आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेणखताची मागणी घटल्याने खत पडून; रासायनिक खताचे दर वाढल्यानंतरही स्थिती राहिली कायम

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती, चढ्या भावाने होणारी विक्री, वेळेवर न होणारा पुरवठा आदी कारणांमुळे तालुक्यातील शेतकरी शेणखताकडे वळतील असं असतांना सर्वांचा अंदाज फोल ठरला. पावसाळा तोंडावर असतांना शेणखताला कुणीच भाव देईना यातून शेतकरी, पशुपालकांना आर्थिक उत्पन्न मिळेल म्हणुन शेणखतासाठी अनेकांनी पशुपालन केले. मात्र शेणखताला कवडीमोल भाव मिळत असल्याने पशू पालकांची भ्रमनिराशा झाली.

पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शेतात शेणखत टाकण्यावरही अनेकजन भर देतात मात्र यावर्षी तस दुर्मिळ चित्र दिसत आहे. मात्र, रासायनिक खतापेक्षा शेणखत सरस आहे. याचा कोणताही दुष्परिणाम पिकांवर व जमिनीवर होत नाही. उत्पादनात मोठी वाढ होण्यासह जमिनीची सुपिकता टिकून जमिनीचा पोत सुधारते जमिनीला एकदा खत दिल्यानंतर तीन वर्षे त्याचे चांगले परिणाम दिसतात उत्पादनातही वाढ होते. मात्र, यावर्षी परिसरातील शेतकरी शेणखत खरेदीसाठी धावपळ करीत असल्याचे दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांचे तथा पशु पालकांचे शेणखत व लेंडी खताला सध्या उकीरड्यावर पडून आहे.

आगोदरच जनावरांची संख्या रोडावल्याने शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उपलब्ध खत विक्रीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र, शेणखताची एक टॅक्टरची ट्रॉली २ हजार रुपयापर्यंत विक्री होत असून, लेंडी खताची एक टॅक्टर ट्रॉली २ हजार २ ०० रुपयापर्यंत मिळत आहे. हा शेणखताचा दर पशुपालकांना परवडणारा नसल्याने यात पशु कसे पाळावे व त्यांना लागणारा खर्च कसा भागवावा हा प्रश्न त्यांना पडलेला असून या पैशातुन पशुंच्या खाद्याचाही खर्च निघत नसल्याचे पशु व शेळी पालक आण्णासाहेब फलके यांनी सांगितले. खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेणखत वाढण्याचा अंदाज होता.

बातम्या आणखी आहेत...