आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन:सिंचनाअभावी सोयाबीन उत्पादन कमी; सिंचनाच्या कमतरतेमुळे उत्पादकताही कमी होणार असल्याचे चित्र

जोलना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. बियाणांचा तुटवडा भरून काढण्यासाठी गतवर्षी राज्यभरात कृषी विभागाच्या वतीने उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले होते त्या अनुषंगाने बदनापूर तालुक्यात सोयाबिन पेऱ्यात चौप्पट ते पाचपट वाढ झालेली आहे. मात्र, गहू-हरभऱ्याच्या तुलनेत सिंचनासाठी पाणी जास्त लागत असल्यामुळे व काही ठिकाणी सोयाबिनला आता फुले येत असल्याने पाणी कमी पडून पिके सोडून देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सिंचनाच्या कमतरतेमुळे उत्पादकताही कमी होणार असल्याचे चित्र बदनापूर तालुक्यात आहे.

मागील काही वर्षांपासून राज्यभरात सोयाबीनचा पेरा हळूहळू वाढतो आहे. सोयाबीनचे पीक हे शेतकऱ्यासाठी हितकारक असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे. खरीप हंगामातील उडीद, मूग, बाजरी या पिकापेक्षा हमखास उत्पन्न देणारे व अन्य पिकांपेक्षा तुलनेने उत्पादकता अधिक व बाजारपेठेत दोन पैसे जास्त येणारे हे पीक ठरत असल्याने नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाऊ लागले. खरीपमध्ये उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा कल रब्बीमध्येही लागवड करण्याकडे वाढला.

पारंपारिक शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी बरोबरच उन्हाळय़ात भाजीपाला, टरबूज, खरबूज अशी फळे किंवा कोथंबीर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, मात्र, सोयाबिनने खरीप हंगामात उत्पादनात साथ दिल्यामुळे यंदा मात्र रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकांपेक्षा सोयाबिनला पसंती दिली. बदनापूर तालुक्यात दरवर्षीपेक्षा चार ते पाच पटीने सोयाबिन पेरा झाला. मात्र, गहू- हरभराच्या तुलनेत सोयाबिनच्या वाणाला जास्त सिंचन करावे लागत आहे. तसेच उन्हाळयात फुलोरा येण्यास उशीर होत असल्यामुळे व पाण्याचा तुटवडा भासत असल्यामुळे भरात आलेले पिकेही काही शेतकऱ्यांनी सोडून दिली.

त्यातच्या त्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासूनच तापमानात मोठी वाढ झाली त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची उत्पादकता कमी होण्याचा धोका आहे, कारण वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे फायद्याच्या दृष्टीने केलेला हा सोयाबिनचा पेरा यंदा फायदा देतो की तोटा हे आगामी काळात समजणार आहे.

बातम्या आणखी आहेत...