आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:रोटरी रेनबो, आर्मीतर्फे प्लास्टिक संकलन वाहनाचे लोकार्पण

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ जालना रेनबो, ग्रीन आर्मी सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक संकलन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

२६ जानेवारी रोजी जालना शहरात प्लास्टिक संकलन मोहीम सुरू करण्यात आली होती. स्वच्छ- सुंदर जालना प्लास्टिक प्रदूषणमुक्त जालना हेच ध्येय समोर ठेवून जालना शहरात प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापराचे काम सुरू झालेले आहे. नागरिकांनी आपले प्लास्टिक या गाडीमध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोचे अध्यक्ष संजय राठी, ग्रीन आर्मीच्या समन्वयक डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उद्योजक सुनील रायठठ्ठा, डॉ. हितेश रायठठ्ठा, उदय शिंदे, स्मिता चेचाणी, डॉ. आरती मंत्री, डॉ. दीपक मंत्री, डॉ. अनुराधा राख, डॉ. सुरेश साबू, निर्मला साबू, डॉ. नितीन खंडेलवाल, केतन शाह, गोपाल मुंदडा, विवेक मनियार, डॉ. प्रशांत पळणीटकर, स्मिता भक्कड, अभय मेहता, मधुलता भक्कड, सृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष संध्या जागीरदार, तारा काबरा, विद्या पाटील, मंजू क्षीरसागर, शारदा आहेरकर, संगीता मुळे, राजश्री मुर्गे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.