आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणसाठी हातभार:शासनाच्या यंत्रात शेतकऱ्यांनी इंधन टाकून केले खोलीकरण; बदनापूरचे तहसीलदार रमेश मुनलोड यांनी केले आवाहन,  जलसंवर्धनासाठी जनजागृती सुरू

बदनापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसहभागातून नाला सरळीकरण, खोलीकरण, गाळ काढणे तसेच शीवरस्ता बनवणे यासाठी प्रशासन मशीन उपलब्ध करून देण्यास तयार आहे. ग्रामस्थांनी डिझेलची व्यवस्था करावी, असे आवाहन तहसीलदार रमेश मुनलोड यांनी केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व निर्मल क्रीडा व दिवशीय विशेष श्रमदान शिबिर उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

बदनापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जल व वृक्षसंवर्धनातून ग्रामविकास या सातदिवसीय शिबिराचे आयोजन कडेगाव येथे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. नारायण बोराडे, अध्यक्षस्थानी डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, व्यवस्थापक डॉ. देवेश पाथ्रीकर यांची मंचावर उपस्थिती होती. या वेळी पुढे बोलताना तहसीलदार रमेश मुनलोड यांनी बदनापूर येथील महाविद्यालय राबवत असलेल्या विविध योजनांचे कौतुक करून कडेगाव येथे होत असलेल्या या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जल संवर्धनाचे महत्त्व विशद करत वृक्ष संवर्धनासारख्या सामाजिक कार्यात तुमचा सहभाग लाभत असल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून ग्रामविकासात वृक्षारोपणामुळे हातभार लागणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाला सरळीकरण, खोलीकरण, गाळ काढणे तसेच शीवरस्ता बनवणे हे महत्त्वाचे विषय असल्याने लोकसहभागातून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन डिझेलची व्यवस्था करावी प्रशासन मशीन उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे या वेळी सांगितले. यावेळी डॉ. नारायण बोराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदनापूर येथील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत सातदिवसीय शिबिराच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कडेगावचे सरपंच भीमराव जाधव, उपसरपंच दत्तूभाऊ निंबाळकर, पोलिस पाटील घनश्याम घुले, क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख, क्रीडा विभागप्रमुख डॉ. एन. जी. खान, डॉ. आर. ए. हजारे, उपप्राचार्य प्रा. श्रीनिवास मुंगे आदींची उपस्थिती होती. या सात दिवशीय शिबिरात स्वचछता अभियान, अंधश्रध्दा निर्मूलन, आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण जनजागृती, जलसंवर्धन व जल व्यवस्थापन जनजागृती होणार असून सांस्कृतीत सत्रात कविसंमेलन, गजल संध्या, गायन स्पर्धा व पथनाटय होणार आहे या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कडेगाव येथील स्थानिक तरुणांचाही यात सहभाग राहणार आहे. दैनंदिन होणाऱ्या बौध्दीक सत्रात ५ एप्रिल रोजी इन्स्टटिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनील जायभाये यांचे वैज्ञानिक जीवन आणि युवक या विषयावर व्याख्यान होणार आहे यावेळी प्रा. डॉ. गणेश गावंडे हे अध्यक्षस्थानी राहणार आहे. ६ एप्रिल रोजी देशाच्या विकासात युवकांची भूमीका या विषयावर जे. ई. एस. महाविद्यालयाचे डॉ. यशवंत सोनुने यांचे मार्गदर्शन लाभणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल हजारे हे असणार आहेत. ७ एप्रिल रोजी राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक प्रेरणा या विषयावर जालना समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. बालाजी मुंडे यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. झेङ ए. पठाण हे असणार आहेत. ८ एप्रिल रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर डॉ. आर. पी. शिंपी यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. मोहन जोशी असणार आहेत. 9 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा आणि युवक या विषयावर राजीव गांधी महाविद्यालय, करमाड येथील डॉ. कालीदास फड यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर दिंडे असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...